रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदान येथे घडलेल्या आणि पोलिसांत दाखल झालेल्या अत्याचाराच्या घटनाप्रकरणी सुरू असलेला सखोल तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या आठवडाभरात या प्रकरणी योग्य ते सत्य समोर ठेवले जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
चंपक मैदानातील अत्याचार प्रकरणाने साऱ्या रत्नागिरीत मोठी खळबळ उडवून दिली. प्रकरणाचा अद्यापर्यंत उलगडा झालेला नाही. या प्रकरणात दडलेले गूढ काय समोर येते, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ही घटना गंभीर असल्यामुळे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर पोलिस याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करतील, असे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 25-09-2024