संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील आरवली, कडवई, माखजन, कसबा आणि देवरूख शहरात गावभेट दौरा, प्रचार फेरी आणि घराघरांत प्रचार करत महाविकास आघाडीने वातावरण ढवळून काढले आहे.
विधानसभा निवडणूक आता काही दिवारांवर येऊन ठेपली असल्याने प्रचारात रंगत येऊ लागली आहे. चिपळूण मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत आहे. महायुती कडून शेखर निकम तर महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघात चिपळूण तालुक्यात १५१ बूथ तर संगमेश्वर तालुक्यात १४९ बूथ आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आरवली, माखजन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधत प्रचार फेरी काढली.
आरवली, माखजननंतर कडवई जिल्हा परिषद गटात आघाडीकडून गावभेट कार्यक्रम राबविण्यात आला. कसबा येथे गावभेट दौरा करत येथील सभागृहात बैठक घेण्यात आली. या वेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उमेदवार प्रशांत यादव, रोहन बने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या बोरूरकर, राष्ट्रवादीचे दत्ता लिंगायत, सुजित महाडिक आदी उपस्थित होते. दरम्यान, उमेदवार प्रशांत यादव यांच्या कन्या स्वामिनी यादव यांनी वडिलांच्या विजयासाठी मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 13/Nov/2024














