देवरूखमधील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त कार्यक्रम

देवरूख : शहरातील श्री देव विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून मंगळवारी विविध कार्यक्रम पार पडले. भक्तांनी दिवसभर विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरात पहाटे श्रींची पूजा, काकडा आरती, पवमान अभिषेक यानंतर दिवसभर दर्शन, सायंकाळी इचलकरंजी येथील ह.भ.प. श्रध्दा गोडसे यांचे कीर्तन, रात्री आरती असे कार्यक्रम झाले. या उत्सवात गुरुवारी, १४ रोजी सकाळी विष्णू याग, शुक्रवारी रात्री तुलसीमाई विवाह व त्रिपूर लावून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. शनिवारी काकडा आरती झाल्यावर दिंडीने व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 13/Nov/2024

Ratnagiri Khabardar add image