साडवली : घोषणा देत बसू नका, प्रत्यक्ष कामाला लागा, प्रचाराचा वेग वाढवा, घराघरांत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार झाला पाहिजे, अशी साद ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घातली.
देवरूख येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार जाधव यांनी पक्ष फोडणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला तसेच काहींची कानउघडणीही केली.
ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अपमानाचा, त्यांच्या सोबत झालेल्या विश्वासघाताचा बदला म्हणून या गद्दारांना सत्तेतून बाहेर फेकले पाहिजे. जसा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला तसा शरद पवार यांचा देखील पक्ष फोडला.
पवार साहेब ज्याला गरूड म्हणून संगोपन करत होते तो कावळा निघाला. चाळीस गद्दार खोके घेऊन सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले. मेळाव्याला रवींद्र माने, डॉ. सुभाष बने, प्रशांत यादव, सुरेश बने, रमेश कदम, राजेंद्र महाडिक, नलिनी भुवड, माने, वेदा फडके, किरवे, स्मिता लाड, लियाकत शहा, रोहन बने आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 13/Nov/2024














