मुंबई : महागाईचा दर ४ टक्के (दोन टक्क्यांच्या फरकासह) ठेवण्याची जबाबदारी सरकारने रिझर्व्ह बँकेवर सोपवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्व शक्य त्या प्रयत्नांनंतरही देशातील महागाई दर कमी होण्याची चिन्हे नाहीत. ऑक्टोबर महिन्यात देशातील किरकोळ महागाईने १४ महिन्यांतील ६. २ टक्क्यांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.
गेल्या महिन्यात हेच प्रमाण ५.५ टक्के होते महागाई दरातील ही वाढ भाजीपाल्याचे दर भडकल्याने झालेली आहे. अन्नधान्याच्या महागाई दरात त्यामुळे वृद्धी झालेली आहे. अनेक अहवालांतून ऑक्टोबरसाठी महागाई दर सुमारे ६ टक्क्यांपर्यंत वाढणार, अशी शक्यता आधीपासूनच होती.
दीड वर्षात महागाईचा दर विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर डिसेंबरमध्ये होणाऱ्या चलनविषयक पुनरावलोकनाच्या धोरण (एमपीसी) बैठकीत रेपो दर जुन्याच पातळीवर कायम राहील, अशी अपेक्षा आहे. गेल्या दहा एमपीसी बैठकांपासून रेपो दर ६.५ टक्क्यांच्या पातळीवर कायम राहिला आहे. यावेळीही त्यात बदल न केल्यास, रेपो दर जुन्या पातळीवरच कायम राहण्याची सलग ११ वी वेळ असेल.
गेल्यावर्षी याच महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर ४.८७ टक्के होता. एनएसओच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर वाढला आणि १०.८७ टक्के झाला. सप्टेंबरमध्ये हाच दर ९.२४ टक्वे होता. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा दर ६.६१ टक्के होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 13/Nov/2024














