रत्नागिरी : अज्ञात कारणातून आंबा फवारणीचे औषध प्राशन केलेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास घडली.
यशवंत लखमा गोताड (७०, रा. गोताडवाडी झरेवाडी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. यशवंत गोताड यांनी रविवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. सुमारास शेतात काम करत असताना अज्ञात कारणातून आंबा फवारणीचे औषध प्राशन केले. काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 15/Nov/2024














