खेड नगर वाचनालयातर्फे दिवाळी अंकांचे प्रदर्शन

खेड : खेड नगर वाचनालयातर्फे दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील विविध प्रकाशकांतर्फे काढण्यात आलेले दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत. या विविध दिवाळी अंकांचे वाचन वाचकांनी करावे आणि त्यायोगे वाचन संस्कृती वृद्धींगत व्हावी, हा या प्रदर्शना मागील हेतू आहे. जास्तीत जास्त वाचकांनी वाचनालयात येऊन हे दिवाळी अंक घेऊन जावे वाचावेत, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष बाळाराम खेडेकर यांनी केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे सचिव सुधीर देवळेकर व माजी प्राचार्य डॉ. सारंग यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य गोविंद राठोड खजिनदार संतोष जेधे व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 15/Nov/2024