रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची दृष्टी असणारे किरण सामंत यांना निवडून द्यावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
राजापूर मतदारसंघात शिवसेना-भाजप राष्ट्रवादी-आरपीआय-रयत क्रांती संघटना- बळीराज सेना आणि मित्रपक्षांचे उमेदवार म्हणून किरण ऊर्फ भैय्या सामंत निवडणूक लढवत आहेत.
त्यांच्या प्रचारासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा ओणी (ता. राजापूर) येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोकणाला पर्यटनाची जोड दिली तर भारतातील सर्व पर्यटक कोकणात खास पर्यटनासाठी येतील. त्यामुळे कोकण विकसित होईल आणि येथील गोरगरीब बेरोजगार जनतेला यातून रोजगाराची चालना मिळू शकते. त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत आरोग्य, रोजगार, शिक्षण, पर्यटन याबाबतीत मोठे व्हिजन असणार किरणभैया सामंत यांना यावेळी बहुमताने निवडून दिले पाहिजे. ते एक उद्योजक आहेत. आमदार झाल्यानंतर तेच आपल्या मतदारसंघात उद्योगधंदे उभे करू शकतात. त्यामुळे कोकणातील तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि कोकणातील बंद झालेले विकासाचे दरवाजे पुन्हा उघडतील, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 15-11-2024














