चेन्नई : पदवीचा अभ्यासक्रम आता अडीच वर्षांत पूर्ण करता येणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष एम. जगदिशकुमार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणामध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम अडीच वर्षांत, तर चार वर्षांची पदवी तीन वर्षांत पूर्ण करता येणार आहे. सक्षम आणि पात्र विद्यार्थ्यांना कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करताना काही विद्यार्थ्यांना ब्रेक हवा असल्यास पुन्हा परीक्षा देण्याची सुविधाही नव्या धोरणात असणार आहे. चार वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शोधनिबंध, पेटंट, पब्लिश पेपर्ससाठी वेळ देता येणार आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, देशभरात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
२० विद्यापीठांची चौकशी
सुमार दर्जाच्या पीएच.डी. प्रकरणी देशातील २० विद्यापीठांची चौकशी करण्यात येणार आहे. पीएच.डी.च्या निकषाचेही संबंधित विद्यापीठांकडून उल्लंघन झाल्याची माहिती त्यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 15/Nov/2024














