खेड : खेड शहरातील समर्थनगर येथील नगरपालिका कर्मचारी वसाहती समोरच अनधिकृत खोक्यांची उभारणी झालेली असताना याच वसाहतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेतही तीन खोक्यांची उभारणी करण्यात आली आहे. रातोरात खोके उभे राहत असतानाही येथे वास्तव्यास असलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या शासकीय जागा हेरत त्या ठिकाणी रातोरात अनधिकृत खोके उभारण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत ३० हून अधिक विनापरवाना खोक्यांची उभारणी केली असतानाही नगर प्रशासनाचे मात्र हाताची घडी अन् तोडावर बोट आहे. समर्थनगर येथील नगरपालिका कर्मचारी वसाहतीनजीक मोकळ्या जागेत सात अनधिकृत खोके उभारण्यात आले आहेत. यातील तीन खोक्यांमध्ये दुकानेही थाटली आहेत. शहर अनधिकृत खोक्यांच्या विळख्यात अडकत असताना यासाठी नेमका वरदहस्त कुणाचा याचा उलगडा झालेला नाही. अनधिकृत खोक्यांच्या उभारणीत अनेकांचे ‘हित’ गुंतले असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी प्रशासनाने अनधिकृत खोक्यांवर बुलडोझर फिरविण्याचे संकेत दिले होते; मात्र अद्यापही प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने अनधिकृत खोके उभे राहत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 15/Nov/2024














