चिपळुणात आजपासून श्री कालभैरव जयंती महोत्सव

चिपळूण : ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूणच्या विद्यमाने कार्तिक कृष्ण प्रतिपदा शनिवार, दि. १६ ते कार्तिक कृष्ण नवमी रविवार, दि. २४ नोव्हेंबरपर्यंत श्री कालभैरव जयंती महोत्सवाचे आयोजन श्री ग्रामदेव जुना कालभैरव मंदिरात करण्यात आले आहे.

उत्सव दरम्यान दि. १६ ते दि. २४ नोव्हेंबरपर्यंत सकाळी सनई चौघडा वादन, श्रींची नित्यनियमित पूजा अर्चा, सायं. ७:३० वा. कर्पूर आरती, श्री कालभैरव ध्यानं, स्तोत्र, अष्टक, कवच पठण. दि. १६ रोजी सायंकाळी श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळाचे भजन, दि. १७ रोजी सायंकाळी अष्टमी थिएटर प्रस्तुत भावबंध हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. दि. १८ रोजी सां. श्री जिव्हेश्वर प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ चिपळूण यांचे भजन, दि. १९ रोजी सायं. श्रीराम प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ वैश्य वसाहत यांचा कार्यक्रम. दि. २० रोजी सायंकाळी श्री कालिकामाता प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ पेठमाप, दि. २१ रोजी सायंकाळी. सहेली महिला संगीत भजन मंडळ, दि. २२ रोजी सायंकाळी श्री स्वरसाधना प्रासादिक महिला मंडळ कान्हे यांचे भजन होईल.

शनिवार दि. २३ रोजी श्री कालभैरव जयंती (कालाष्टमी) सकाळी १०.३० ते १ जन्मकाळ कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. उदयबुवा फडके (गोवा) हे करतील. दुपारी १ ते ४ वाजता श्री गांधारेश्वर भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक श्रींच्या मंदिरापासून ब्राह्मणआळी, राऊतआळी, शेट्येआळी, श्रीराम चौक, वैश्य वसाहतमधून मुरादपूरकडे साळीवाडी, कुंभारवाडीकडून श्री क्षेत्र गांधारेश्वर भेट घेऊन तळ्यातील श्री गणेश मंदिराकडून बेंदरकर आळी, ब्राह्मण आळीतून श्रींच्या मंदिरात येईल. संध्याकाळी ५ ते ७ वा. कै. वामनराव साडविलकर संस्थापित संगीत स्वरसुमनांजली कार्यक्रम होईल. दि. २४ रोजी लळीत, दु. ११ ते २ वा. महाप्रसाद, सायं. ६:३० वा. श्री वेस मारुती भेटीसाठी श्रींची पालखी मिरवणूक, रात्री लळीताचे कीर्तन होईल. ग्रामदेवतेच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे व्यवस्थापकीय विश्वस्त किशोर शेट्ये, समीर शेट्ये, महाजन, पंकज कोळवणकर, सुमंता शिंदे, चंद्रशेखर लाड, संतोष डांगे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 16/Nov/2024

Shree clinic