Bigg Boss Marathi Season 5: ‘बिग बॉस’च्या घरात वर्षा व निक्की झाल्या मालकीन बाई! ऑर्डर ऐकून जान्हवीला रडू

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाचा सीझन केवळ 70 दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे.

आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक बाहेर पडून आता घरात 8 स्पर्धक उरले आहेत. अशातच बिग बॉसच्या घरात मालक आणि सांगकाम्यांचा टास्क रंगला. यामध्ये कोणती टीमने बाजी मारली कोणती टीम हरली हे जाणून घेऊया.

आजच्या भागात लगोरीचा खेळ रंगणार आहे. यामध्ये ‘बिग बॉस’कडून दोन टीम करण्यात आल्या. यात एका टीममध्ये जान्हवी, अंकिता, पॅडी आणि अभिजीत. तर दुसऱ्या टीममध्ये निक्की, सुरज, वर्षा आणि धनंजय अशी विभागणी करण्यात आली. या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक आणि हरणारी टीममधील सदस्य हे सांगकामे. हा टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीमकडून भरपूर मेहनत घेतली गेली. अंकिता आणि वर्षा ताईंमध्ये चांगलीच लढतही झाली. एवढचं काय तर जान्हवीला टास्क खेळताना दुखापतही झाल्याचं प्रोमोत पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की, सुरज, वर्षा आणि धनंजय यांची टीम जिंकल्याचं पाहायला मिळतेय. मालक बनल्यानंतर हे सदस्य जान्हवी, अंकिता, पॅडी आणि अभिजीत यांना कामे सांगताना प्रोमोमध्ये पाहायला मिळताय. एवढंच काय तर वर्षा यांनी जान्हवी आणि अंकिताकडून पाय दाबून घेतल्याचंही प्रोमोत दिसलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 25-09-2024