Rain Alert : रायगडमध्ये ‘रेड’ तर रत्नागिरी, पालघर सिंधुदुर्गात अतिजोरदार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट

रत्नागिरी : परतीच्या पावसाचा समारोप जोरदार आणि प्रभावी ठरला असून पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सातत्य राखणाऱ्या पावसाने बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात जोर कायम राखला होता. त्यामुळे पुढील दोन दिवस रायगड जिल्ह्यात रेड तर रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी रात्री पावसाचे सातत्य होते तर बुधवारीही काही भागात गडगडाटी पावसाने हजेरी लावली होती. पावसाचा परतीचा प्रवास लांबणार असून या कालावधीत जोरही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरींनी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र परतीच्या पावसाला अनुकूलता मिळाल्याने मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी बहुतांश तालुक्यात ५० मि.मी. पेक्षा जात पाऊस झाला. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता.

पावसाचा जोर ओसरू लागल्याने अनेक भागात रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र पावसाने सातत्य राखल्याने या कामात आता व्यत्यय येऊ लागला आहे. रत्नागिरी-हातखंबा मार्गावार मुख्य रस्त्यांचे कॉक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, पावसामुळे या कामात अडथळे आले. त्यामुळे काही भगात वाहतूकही बाधित झाली.

दरम्यान, बुधवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४४.६३ मि.मी. च्या सरासरीने ४०१.६७ मि.मी. एकूण पाऊस झाला. यामध्ये मंडणगड तालुक्यात १८ मि.मी. दापोली ३९, खेड ३८.८५, गुहागर ५४.२०, चिपळूण ४५.३३, संगमेश्वर ४९.१६, रत्नागिरी ७०.११, लांजा २८.४०, राजापूर ५८.६२ मि.मी. पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे एक जून पासून ४०६० मि.मी. च्या सरासरीने एकूण ३६ हजार ५४६ मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद संगमेश्वर तालुक्यात (४४१६ मि.मी.) तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात (३३८१. मि.मी.) झाली आहे. जिल्ह्यात १२० टक्के पाऊस झाल आहे. गतवर्षी या कालावधीत १०२ टकेक पाऊस झाला होता. गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाने ५०० मि.मी. ची सरशी साधली आहे.

परतीच्या पावासाचे अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे

मुसळधार पावसाचा रेड अलर्ट : रायगड, पुणे
अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट: मुंबई, पालघर, रत्नागिरी, नाशिक, नगर, सिंधुदुर्ग
जोरदार पावसाचा यलो अलर्ट: नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगेली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचरोली विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट : धाराशिव, लातूर, नदिड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 26-09-2024