लांजा : राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन छेडल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. लांजा तालुक्यातील एकूण ८० शाळा बंद तर ३५६ गुरुजी सामूहिक रजेवर गेल्याने विद्यार्थ्यांना निराश होऊन माघारी परतावे लागले.
लांजा तालुक्यातील २०५ शाळांपैकी १२५ शाळा भरल्या होत्या. १५१ शिक्षक शाळेत हजर होते. शिक्षकच शाळेत हजर नसल्याने शालेय व्यवस्थापन समितीने शाळा सुरू करण्यास असमर्थता दर्शवल्याचे चित्र बुधवारी लांजा तालुक्यात पहायला मिळाले.
राज्यातील तब्बल बावीस शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये शिक्षकांची मान्यता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती संबंधी राज्य सरकारच्या धोरणांना लक्ष्य केले आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत शिक्षकांनी सरकारचे पुन्हा एकदा लक्ष वेधले.
राज्य शासनाच्या संच मान्यतेच्या काढलेले आदेश, कंत्राटी शिक्षक भरती, गणवेश वाटप, शालेय पोषण आहार, ऑनलाईन कामे या बाबत राज्य शासनाच्या धोरण विरोधात शिक्षक संघटना यांनी आंदोलन सुरू केले आहे.
काळ्या फिती लावून काम केले, तर प्रशासकीय व्हॉटस्अॅप ग्रुपमधून बाहेर पडणे, सामूहिक रजा आंदोलन अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे. रजा टाकून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या रजा आंदोलनत काही ठिकाणी फूट पडल्याचेही दिसून आले.
सामूहिक रजा आंदोलनसाठी लांजा तालुक्यात शिक्षक समन्वय समितीने आवाहन केले होते. त्यानुसार ३५६ शिक्षक सहभागी झाले होते. मात्र ८० शाळा शिक्षकच गैरहजर असल्याने बंद झाल्याचा अहवाल लांजा पंचायत समिती कार्यालयने जिल्हा परिषदेला दिला.
आंदोलनामुळे तालुकाभरातील २०५ शाळांपैकी १२५ शाळा सुरू होत्या. बुधवारी झालेल्या रजा आंदोलनमुळे विद्यार्थी शैक्षणिक नुकसान झाले. मात्र गुरुजीच गैरहजर राहिल्याने निराश होऊन घरी परतलेले विद्यार्थी शाळेला सुट्टी मिळाल्याने काही विद्यार्थी खुशीत दिसत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 26/Sep/2024