चिपळूण : उक्ताड येथे इमारतीवरुन पडून तरुणीचा मृत्यू

चिपळूण : शहरातील उक्ताड येथे एका इमारतीवरुन पडलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिद्री अशफाक घारे (16, निवसेकर हाईट्स,- उक्ताड) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्री 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास शहरातील उक्ताड- कानसेवाडी येथे असलेल्या निवसेकर हाईट्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 29-11-2024

Tata nexon