अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीच्या सांताक्रुझ येतील घरावर ईडीने छापा टाकला आहे. पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

यामध्ये शिल्पा शेट्टीच्याही घरी ईडीने ही कारवाई केली आहे.

ईडीने सर्च ऑपरेशन का केलं?

मिळालेल्या माहितीनुसार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केली आहे. अडल्ट कन्टेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या अॅपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राज कुंद्रा यांच्यावर आरोप आहे. याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. याच आरोपांखाली राज कुंद्रा काही दिवस तुरुंगात होते. आता ते या खटल्यात जामिनावर बाहेर आहेत.

ईडीकडून एकूण 15 ठिकाणी छापेमारी

अडल्ट कन्टेन्ट तयार करण्याबाबतच्या आरोपत राज कुंद्रा यांच्या कंपनीचे नाव आले होते. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी ईडीने आज उत्तर प्रदेश आणि मुंबईत एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घराचाही सहभाग आहे. या छापेमारीत ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 29-11-2024