‘रंग माझा वेगळा’ (rang maza vegla) अन् ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत अभिनय करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदेने (reshma shine wedding) थाटामाटात लग्न केलंय. ‘आयुष्याची नवी सुरुवात’ असं कॅप्शन देत रेश्माने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
दोघांचे फोटो समोर येताच चाहत्यांनी अभिनेत्रीचं अभिनंदन केलंय. गेल्या आठवड्याभरापासून रेश्माच्या लग्नाची धामधूम सुरु होती. रेश्माने हळद, मेहंदीचे खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे रेश्माच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर आज रेश्माने लग्नाचे फोटो पोस्ट केल्याने चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
रेश्मा शिंदेने थाटामाटात केलं लग्न
रेश्मा शिंदेने लग्नात गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसलंय. तर तिच्या नवऱ्याने शेरवानी, धोतर अन् रेश्माच्या साडीला मॅचिंग गुलाबी रंगाचं उपरणं परिधान केलंय. रेश्माने दागिन्यांचा श्रृंगार केला असून ती खूप सुंदर दिसतेय. रेश्माने एकूण सहा फोटो पोस्ट केलेत. रेश्माच्या नवऱ्याचं नाव पवन असून तो काय काम करतो याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये. दरम्यान रेश्माने थाटामाटात अन् पारंपरिक अंदाजात लग्न केलंय. रेश्माच्या लग्नाला तिचे कुटुंबीय अन् मनोरंजन विश्वातील तिचे कलाकार मित्र-मैत्रिणी उपस्थित असल्याचं बोललं जातंय.
मालिकांमधून रेश्माला मिळालं खूप प्रेम
रेश्माने लग्नाचे फोटो पोस्ट करताच अभिनेत्री हेमांगी कवी, ऋतुजा बागवे, ऋतुजा देशमुख, शिवानी सोनार, सिद्धार्थ बोडके, सावनी रविंद्र अशा कलाकारांनी तिचं अभिनंदन केलंय. रेश्माला तिच्या मालिकांमधील भूमिकांमधून खूप लोकप्रियता मिळाली. ‘लगोरी’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘बंध रेशमाचे’ अशा अनेक टीव्ही मालिकांमधून तिने कलाविश्वात स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. सध्या अभिनेत्री ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकीची भूमिका साकारत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 29-11-2024