19 वर्षीय सुंदरी मिस युनिवर्स इंडिया 2024 ठरली आहे. 19 वर्षीय रिया सिंघाने मिस युनिवर्स इंडिया खिताब मिळवला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये मिस युनिवर्स इंडिया 2024 स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली.
या ग्रँड फिनालेमध्ये रिया सिंघाने बाजी मारली आहे. 19 वर्षीय रिया सिंघा 51 सुंदरींवरमध्ये वरचठ ठरत मिस युनिवर्स इंडियाचा मुकुटाची मानकरी ठरली आहे. बॉलीवुड अभिनेत्री आणि मिस यूनिवर्स इंडिया 2015 उर्वशी रौतेच्या हि स्पर्धेची परीक्षक होती. उवर्शी रौतेलानेच रिया सिंघाला मिस युनिवर्स इंडियाचं मुकुट घातलं. यानंतर रिया आणि तिच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
19 वर्षीय सुंदरी ठरली मिस युनिवर्स इंडिया
मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब जिंकणारी रिया सिंघा आता मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याबद्दल रियाने सर्वांचे आभार मानले आहेत. रिया सिंघा म्हणाली, “आज मी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब जिंकला. मी खूप आभारी आहे. मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी स्वतःला या मुकुटासाठी पात्र समजू शकते. मी मागील विजेत्यांकडून खूप प्रेरित आहे.”
रिया सिंघा विश्वसुंदरी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार
मिस युनिव्हर्स इंडिया 2024 स्पर्धेत रिया सिंघा विजेती ठरली, तर प्रांजल प्रिया फर्स्ट रनर अप, तर छवी वर्ग सेकंड रनर अप ठरली. सुष्मिता रॉय आणि रुपफुजानो व्हिसो या तिसऱ्या आणि चौथ्या उपविजेत्या ठरल्या. उर्वशी रौतेलानेही रिया सिंघाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आणि भारत यंदा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकेल अशी आशा व्यक्त केली. “या वर्षी भारत पुन्हा मिस युनिव्हर्सचा ताज जिंकेल, असं उर्वशीने म्हटलं आहे. रिया सिंघा मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 26-09-2024