संगमेश्वर : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गुरांमुळे अपघात होत आहेत. गुरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संगमेश्वरमधील व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे पोलिस ठाण्यात केली आहे. संबंधित मालकांना सामाजिक जाणीवच राहिलेली नाही, असे त्या निवेदनात नमूद केले आहे.
मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भातशेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे शेतकरी गोठ्यातील गुरे चरण्यासाठी मोकळी सोडून देतात, राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून बनविण्यात आला आहे. त्यामुळे गावागावातील मोकाट गुरे महामार्गावर ठाण मांडून बसतात. हे चित्र संगमेश्वर येथे वारंवार पाहायला मिळत आहे. या गुरांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून, अनेकवेळा अपघातही होतात. रस्त्यावर आलेली गुरे वाचवण्याच्या नादात चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. मोकाट गुरांचा लोकाना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पडणाऱ्या अपघातात काहीजण जखमी होतात. या अपघातात काहींना जीवही गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या अपघातात जीवितहानी झाली तर संबंधित गुरांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी आणि संगमेश्वर व्यापाऱ्यांनी केली आहे. तसे झाले तरच मालकांना कायद्याची भीती राहील, असे व्यापाऱ्यांकडून पोलिसांना सांगण्यात आले. तसे झाले तरच मालकांना कायद्याची भीती राहील, असे व्यापाऱ्यांकडून पोलिसांना सांगण्यात आले.
गुन्हे दाखल झाल्यावर मोकाट गुरांचे मालक आपापली गुरे सुरक्षित ठिकाणी ठेवतात. प्रत्येक शहरामध्ये मोकाट गुरांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. संबंधित यंत्रणांनी अधिकारांचा वापर केला तर गुरांचा विषय कायमचा मार्गी लागेल. – गुरू सावंत, चालक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 26/Sep/2024