मंडणगड येथील टँकर लोडिंग पॉईंटवर काम करताना फोरमनचा मृत्यू

रत्नागिरी : एल.जी. टैंक येथील लोडिंग पॉईंटवर काम करत असताना फोनमनचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४० वा. सुमारास घडली. संतोष महादेव भावे (वय ४८, रा. गुडेघर मंडणगड, रत्नागिरी) असे या फोरमनचे नाव आहे. गुरुवारी दुपारी संतोष भावे हे नेहमीच्या कामाच्या ठिकाणी एल.जी. टैंक येथे लोडिंग पॉईंटवर काम करत होते. तेव्हा त्यांचे सहकारी फोरमन दामोदर गोसावी यांना संतोष भावे तेथील लोडिंग पॉईंटवर पडलेले दिसून आले.

गोसावी यांनी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला परंतु, भावे यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून प्रा. आ. केंद्र देव्हारे येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 30/Nov/2024

Samarth gold