मुंबई : रविवारी मध्यरात्री विक्रांत मेस्सीनं अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं चाहते दु:खी झाले. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, अभिनेत्यानं खुलासा केला की, तो भविष्यात उत्तम पती, वडील आणि मुलगा बनण्यासाठी अभिनयापासून दूर राहणार आहे.
विक्रांत मेस्सीनं संन्यास घेण्याची घोषणा केली आणि सध्या इंटरनेटवर त्याचाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विक्रांत मेस्सीचं एक जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो 9 महिन्यांचा मुलगा वर्धनच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे.
आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये Vikrant Massey म्हणाला की, “नमस्कार, गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्ष खूप चांगली गेली आहेत. तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसा मी पुढे जातोय, तसतसं मला समजतं की, आता घरी जाण्याची वेळ आलीय. पती, वडील आणि मुलगा म्हणून… आणि अभिनेता म्हणूनही… त्यामुळे येत्या 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत. शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी… पुन्हा धन्यवाद… प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा सदैव ऋणी राहीन.”
अभिनेत्यानं अलिकडेच ‘द साबरमती रिपोर्ट’ च्या प्रमोशन दरम्यान आपली भीती शेअर केली होती, चित्रपटामुळे वाद निर्माण झाला होता. यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत विक्रांतनं खुलासा केला होता की, त्याला सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून धमक्या येत होत्या, ज्यामध्ये त्याच्या नवजात मुलालाही लक्ष्य करण्यात आलं होतं.
विक्रांत मेस्सी म्हणालेला की, “सोशल मीडिया, व्हॉट्सॲप मला धमक्या येत आहेत. या लोकांना माहीत आहे की, मी 9 महिन्यांपूर्वी मुलाचा बाप झालो. नीट चालताही न येणाऱ्या माझ्या मुलाचं नाव मध्येच घेतलं जात आहे. मला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. आपण कोणत्या समाजात राहत आहोत? माफ करा, घाबरू नका. आम्ही घाबरलो असतो, तर हा चित्रपट बनवून बाहेर आणला नसता.”
‘साबरमती रिपोर्ट’मध्ये विक्रांत मेस्सीसोबत राशी खन्ना आणि रिद्धि डोगरा यांनी स्क्रिन शेअर केली आहे. याचं दिग्दर्शन धीरज सरनानं केला आहे. हा चित्रपट साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 कोचमध्ये आग लागल्याच्या प्रसंगासंदर्भात आहे.
वादग्रस्त प्रकरणावरील हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. अनेकांनी या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं, तर काहींनी या चित्रपटावर टीकाही केली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) 2024 मध्ये दाखवण्यात आला आहे.
15 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आलेली हा चित्रपट गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमध्ये टॅक्स-फ्री करण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 02-12-2024