एलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या अफेयरची चर्चा? फोटो व्हायरल

टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा एलॉन मस्क चर्चेत आले असून त्यांचा अफेयरची चर्चा रंगली आहे.

एलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. मस्क आणि जॉर्जिया यांचा एकत्र डिनर करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून याच फोटोमुळे अफवांना पेव फुटलं आहे. यानंतर मस्क यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

एलॉन मस्क आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या अफेयरची चर्चा?

एलॉन मस्क (Elon Musk) आणि जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांचा एक फोटो (Photo Viral) सोशल मीडियावर (Dating Rumours) व्हायरल होत आहे. अलिकडेच 24 सप्टेंबर रोजी मस्क आणि मेलोनी यांची भेट झाली होती न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान एका पुरस्कार सोहळ्यात दोघेही भेटले होते. जेवणाच्या टेबलावर दोघांची चर्चा झाली. यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर, अनेक इंटरनेटवर मस्क आणि मेलोनी यांच्या अफेयरची चर्चा रंगली आहे.

मस्क-मेलोनी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा

मस्क आणि मेलोनी यांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असून या फोटोवर चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर युजर्स एलॉन मस्क आणि जॉर्जिया मेलोनी एकमेकांना डेट करत असल्याचा असा अंदाज लावत आहेत. मेलोनी यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मस्क यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिला आहे.

फोटो व्हायरल होताच ट्विटरचे CEO म्हणाले…

टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी पुढे येत आता डेटिंगच्या अफवांवर आपली प्रतिक्रिया त्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. मस्क यांनी X मीडिया पोस्टवर करत म्हटलं की, “आम्ही डेटिंग करत नाही. त्यावेळी माझी आईही तिथे उपस्थित होती.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 26-09-2024