PM Modi and Giorgia Meloni ‘Melody’ Moment : इटली दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी मेलोनी यांना भारताची प्रसिद्ध ‘मेलोडी’ टॉफी भेट देताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचा हा खास हावभाव पाहून जॉर्जिया मेलोनी खळखळून (Giorgia Meloni) हसल्या. या दोन नेत्यांमधील अद्भुत नाते आणि मैत्रीने इंटरनेटवर पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत. भारतातील बालपणीच्या आठवणींशी जोडलेली ‘मेलोडी’ टॉफी आता भारत-इटली मैत्रीच्या क्षणाचा एक भाग बनली आहे.
PM Modi and Giorgia Meloni: मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या…
अशातच, याव्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे. सोबतचकाही मजेशीर प्रतिक्रिया देखीलउमटत आहेत. इटली दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी मेलोनी यांना भारताची प्रसिद्ध ‘मेलोडी’ टॉफी भेट देताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचा हा खास हावभाव पाहून जॉर्जिया मेलोनी खळखळून हसल्या. या दोन नेत्यांमधील अद्भुत नाते आणि मैत्रीने पुन्हा एकदा ऑनलाइन लोकांची मने जिंकली आहेत. भारतात बालपणीच्या आठवणींशी जोडलेली मेलडी टॉफी आता भारत-इटली मैत्रीच्या क्षणाचा भाग बनली आहे. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत असून ते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडेयाचव्हिडीओमध्ये जॉर्जिया मेलोनी यांचीदेखीलमिश्किलप्रतिक्रियासाऱ्याचेमनजिंकणारीठरतआहे.
PM Modi and Giorgia Meloni Video : व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल, जगभरात चर्चा
रोममध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासाठी एक खास भेट आणली होती. तीम्हणजेप्रसिद्ध पार्लेची ‘मेलोडी’ टॉफी. पंतप्रधान मोदींनी हे संपूर्ण पाकीट पंतप्रधान मेलोनी यांना दिले आणि या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. टॉफी मिळाल्यानंतर मेलोनी खूप आनंदी दिसत आहेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची मैत्री बरीच प्रसिद्ध आहे आणि सोशल मीडियावर त्यांच्या मैत्रीसाठी ‘मेलोडी’ हा शब्द लोकप्रिय आहे. आता पंतप्रधान मोदींनी या सोशल मीडिया ट्रेंडला आपल्या राजनैतिक धोरणाचा आधार बनवले आहे.
PM Modi and Giorgia Meloni Video : व्हिडिओमध्ये नेमकंकाय दिसत आहे?
मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे आणि लिहिले आहे, “भेटवस्तूसाठी धन्यवाद.” व्हिडिओमध्ये मोदी आणि मेलोनी दोघांच्या हातात लोकप्रिय भारतीय चॉकलेटने भरलेले एक पाकीट आहे. क्लिपमध्ये इटलीच्या पंतप्रधान म्हणतात, “पंतप्रधान मोदींनी भेट म्हणून खूप छान टॉफी आणली आहे.” यावर पंतप्रधान मोदी उत्तर देतात, “मेलोडी.”
#Melodi हा टॅग सर्वप्रथम डिसेंबर २०२३ मध्ये दुबईतील COP28 दरम्यान एका सेल्फीमध्ये पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर जून २०२४ मध्ये इटलीतील G7 शिखर परिषदेदरम्यान मेलोनीने पंतप्रधान मोदींसोबत एक व्हिडिओ शेअर केला आणि हसत हसत म्हटले, “हॅलो मित्रांनो, मेलोडी टीमकडून.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 20-05-2026














