मुंबई : आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आमदार निलेश राणेंना (Nilesh Rane) दिला आहे.
जर उगाच कोणी त्रास दिला तर माझ्या सोबत 72 हजार लोक आहेत, त्यांना घेऊन रस्त्यावर उतरु हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असेही वैभव नाईक म्हणाले.
आता मला आमदार म्हणून हाक मारू नका
आपला पराभव कशामुळे झाला हे निकालादिवशी समजलं आहे. त्यामुळे आपण चिंतन करण्यासाठी नाही तर पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्यासाठी ही बैठक घेतल्याचे नाईक म्हणाले. शिवसेनेला संघर्ष नवा नाही. माझ्यासमोर राजकारणात, समाजकारणात यापुढे राहायचं की नाही हा प्रश्न होता. मी कारण न देता पराभव स्वीकारला. जो जिता वही सिकंदर या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. आता मला आमदार म्हणून हाक मारू नका तर वैभव नाईक म्हणून हाक मारा. आमदार हे पद आयुष्यभर मलाच भेटेल असा टीळा लावून कोणी येत नाही. आपल्या सोबत जी लोकं राहतील त्यांना घेऊन काम करायचा निश्चय केला. माझ्या पराभवाने राज्यातील अनेक लोक हळहळले, त्यांनी अनेकांनी फोन केले, हाच माझा विजय असल्याचे नाईक म्हणाले.
लाडक्या बहिणींचे 2100 बंद झाले तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल
नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेल्या निलेश राणेचं अभिनंदन केलं आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवावं की ही लोकशाही आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच वैभव नाईक यांनी निलेश राणेंना दिला आहे. जर उगाच कोणी त्रास दिला तर माझ्या सोबत 72 हजार लोक असल्याचे नाईक म्हणाले. त्यांना घेऊन रस्त्यावर उतरु असेही ते म्हणाले. निवडून आलेल्यांनी चागलं काम करावं असा टोला मारत बहिणींना 1500 वरून 2100 रुपये द्यावे. मात्र 2100 बंद झाले तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल.
वैभव नाईकांना अश्रू अनावर
हिंदू खतरे मे है असं म्हणता 15 वर्ष केंद्रात सत्ता करता. लोकांना फसवता मात्र या भूमिका जास्त काळ टिकणार नाहीत असेही नाईक म्हणाले. आमदार ही पदवी मी स्वतः मिरवण्यासाठी वापरली नाही. असं बोलत असताना वैभव नाईकांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 02-12-2024