सावर्डेतील श्री देव केदारनाथ मंदिरात लोटांगण उत्सव उत्साहात

सावर्डे : सावर्डेची ग्रामदेवता श्री देव केदारनाथ व देवी मरीआईचा देवदिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सालाबादप्रमाणे लोटांगण कार्यक्रम देखील झाला.

दरवर्षी देवदिवाळीच्या निमित्ताने ग्रामदेवतेच्या मंदिरात यात्रा भरते. वर्षभराचे नवस फेडणे, मरिआईला निशाण अर्पण करणे यासाठी तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भक्तगण या यात्रेला येतात. या ठिकाणी एक अनोखी प्रथादेखील आहे. शरीरातील कोणत्या अवयवाला आजार असल्यास तो अवयव लाकडाचा तयार करून त्या भक्ताला वाजतगाजत मंदिरात आणून तो लाकडी अवयव मंदिरात अर्पण केला जातो. ही अनोखी प्रथा या निमित्ताने सुरू आहे. तसेच नवसकर्ते भक्त मंदिर परिसरात लोटांगण घालत मंदिराला पाच प्रदक्षिणा घालतात. यावेळी पंचक्रोशितील भाविक उपस्थित असतात. ढोल-ताशांच्या गजरात हा उत्सव साजरा केला जाते. याहीवर्षी अलोट गर्दीमध्ये हा कार्यक्रम साजरा झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 03/Dec/2024