चिपळूण : वालावलकर रुग्णालयात पोलिसांसाठी कार्यशाळा

चिपळूण : वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे मेडिको लीगल केस हॅण्डलिंग आणि फॉरेन्सिक प्रॅक्टिसेस यावर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा नुकतीच झाली. कार्यशाळेचे आयोजन भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सावर्डे या ठिकाणी करण्यात आले होते. ही कार्यशाळा सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झाली.

या प्रशिक्षणाला जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, सावर्डेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड यांची उपस्थिती होती. रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. नेताजी पाटील व जिल्ह्यातील १५० पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही कार्यशाळा हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम असून, ट्रस्ट ने ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्याची ही पोचपावती आहे, असे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी सर्व उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मेडिको लिगल केस संदर्भात विशेष माहिती देण्यात आली. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक ताण भासू नये यासाठी संस्थेच्यावतीने ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:12 PM 26/Sep/2024