रत्नागिरी : मच्छीमार्केटजवळील रिक्षा थांबा हलवणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या जुन्या बाजारपेठेतील मच्छीमार्केट जवळचा रिक्षा स्टॉप तेथीलच तलावासमोर नेला जाणार आहे. शहरातील या रिक्षा स्टॉपमागे असणाऱ्या मच्छीमार्केट इमारतीतील गाळे रिक्षा स्टॉपचा अडथळा होत असल्याने कोणीही घेत नाही. त्यामुळे नगर परिषदेचे नुकसान होत असल्याने हा रिक्षा स्टॉप जवळच स्थलांतरित करण्याचे नियोजन केले जात आहे.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या नियोजनाची माहिती माजी पालकमंत्र्यांना दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 03/Dec/2024