संगमेश्वर : आरवली गुरववाडी गडनदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या प्रशांत प्रभाकर भागवत हा तरुण असता नदीपत्रात बुडून बेपत्ता झाला आहे.
ही घटना सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे. नदीपत्रात बेपत्ता प्रशांतचा शोध घेण्याचे काम चालू आहे. परंतु चौवीस तास उलटून गेले तरी अद्याप शोध लागलेला नाही. प्रतीक्षा प्रदीप यादव ही आरवली गडनदी पात्रात बुडून बेपत्ता झालेल्या प्रशांत प्रभाकर भागवत वय वर्ष 21 राहणार रांबाडे चाळ, खेरशेत तालुका चिपळूण याची काकी असून ती सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास आरवली गुरववाडी येथील गडनदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेली त्याच्या बरोबर प्रशांत हा नदीपत्रात आंघोळ करण्यासाठी गेला होता. या दरम्यान नदीपत्रात कपडे ठेवण्यासाठी नेलेला प्लास्टिक चा टफ पाण्यातून वाहून गेला. तो पकडण्यासाठी प्रशांत याने नदीपत्रात पाण्यात उडी मारली असता तो पुन्हा बाहेर आलाच नाही. घटना घडल्या पासून बेपत्ता झालेल्या प्रशांत चा शोध घेण्यासाठी नदीपात्रात शोधकार्य केला जात आहे. परंतु नदी पात्रातील पाण्याची पातळी जास्त व डोह तसेच खडक असल्याने अडचण निर्माण होत असल्याने चौवीस तास उलटून गेले तरी शोध लागलेला नसून शोधकार्य चालूच आहे. माखजन तसेच संगमेश्वर पोलीस, आरवली गावचे सरपंच, स्थानिक ग्रामस्थ व बेपत्ता युवकाचे नातीवाईक शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नदी पात्रात बुडून बेपत्ता झाल्याच्या घटनेची माहिती त्याचवेळी बेपत्ता प्रशांत याचे वडील प्रभाकर बाळकृष्ण भागवत यांनी माखजन पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी हे अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 03/Dec/2024














