संगमेश्वरात भातशेतीवर निळ्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात सकाळी दाट धुके तर दुपारी कडक उन्हाळा असे वातावरण आहे. भात कापणीसाठी शेतकरी पावसाच्या विश्रांतीच्या प्रतीक्षेत असतानाच निळे भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात ६ हजार हेक्टरवर भातशेती करण्यात आली आहे. मात्र गोळवली, राजवाडी, चिखली वाशीतर्फे संगमेश्वर, लोवले आदी ठिकाणी निळ्या भुंगेऱ्यांचा शेतीवर परिणाम झाला आहे. गोळवली गावातील बारा शेतकऱ्यांचे भात शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. इतर ठिकाणी पंचनामा करण्याचे काम कृषी विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. निळ्या भुंगेऱ्या रोगामुळे दोन ते तीन हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:27 PM 26/Sep/2024