अनिरुद्ध शेखर निकम याला ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान

चिपळूण : आ. शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध निकम याने ऑस्ट्रेलियातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने ‘मास्टर ऑफ अॅग्रीकल्चर सायन्स इन दि फिल्ड ऑफ हॉर्टिकल्चर’ या विषयात डॉक्टरेट मिळविली.

क्वीन्सलँन्ड युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियातून त्याने शिक्षण पूर्ण केले. नुकताच ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या पदवीदान समारंभात त्याला ही पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला आ. शेखर निकम, माजी सभापती पूजा निकम, कन्या सई निकम सुर्वे, मुक्ता निकम आदी उपस्थित होते. आ. निकम हे कृषी पदवीधर आहेत. आता त्यांच्या मुलानेही या क्षेत्रात पदवी मिळविली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 06/Dec/2024

Tata altroz