रत्नागिरी : निर्लेखित जडसंग्रह साहित्य विक्रीसाठी इच्छुकांना आवाहन

रत्नागिरी : मुख्याध्यापक, शासकीय तांत्रिक विद्यालय, रत्नागिरी, भाटे पुलानजीक, राजिवडा या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पद्धतीने विक्री करावयाची आहे.

इच्छुकांनी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दरपत्रक सिलबंद लिफाफ्यात पाठवावी, असे आवाहन विद्यालय/केंद्र कनिष्ठ महाविद्यालय, राजिवडाचे मुख्याध्यापकांनी केले आहे. निविदेच्या बंद लिफाफ्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा.

दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वा. नंतर आलेल्या निविदांच्या स्वीकार केला जाणार नाही.

निविदा दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उघडण्यात येतील. विक्री करावयाचे निर्लेखित जडसंग्रह साहित्य कार्यालयात दिनांक २६ सप्टेंबरपासून शनिवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० वा. ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाहता येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 27/Sep/2024