यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करा : अशोक पोंक्षे

माखजन : आयुष्यात यश मिळवायचं असेल तर प्रत्येक विद्याथ्यनि आपलं ध्येय निश्चित करा असा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्ते व श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष अशोक पोंक्षे यांनी दिला. ते संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल येथे, गुरुदक्षिणा सभागृहात जिल्हास्तरीय निसर्गचित्रकला स्पर्धा व दशक्रोशिस्थ आंतर शालेय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व मा.पं.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे, सचिव दीपक पोंक्षे, सुभाष सहस्त्रबुद्धे, दीपक शिगवण, मुख्याध्यापिका रुही पाटणकर, इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले, हनुमान पोंक्षे, पर्यवेक्षक अंबादास घाडगे उपस्थित होते.

दरम्यान श्री पोंक्षे पुढे म्हणाले की स्पर्धेतील चित्रे पाहून मी भारावून गेलो आहे. शाळेतील कलादालनाचा उपयोग नुसता शाळेपुरता मर्यादित राहत तो, अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना होतो आहे, हे कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. दरम्यान या स्पर्धेत जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रणय फराटे (बळोते, मंडणगड) प्रथम क्रमांक मिळवला याना ७ हजार ७७७ तर द्वितीय सुजल निवाते (सावर्डे) रोख ५ हजार ५५५ रोख, तृतीय क्रमांक टेनझीन ओल्डन व अजित मते याना विभागून देण्यात आला. याना रोख प्रत्येकी १६७५ रु तर उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले. याला १ हजार १११ रुपये देऊन गौरविण्यात आले. प्रत्येकी शिल्ड व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:57 PM 09/Dec/2024