लांजा : विनापरवाना टेपोतून गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी धुंदरे येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. २५) रात्री खेरवसे-जाधववाडी येथे केली. यासाठी प्राणीमित्रांनी पोलिसांना सहकार्य केले.
याची तक्रार श्रेयस आनंद शेट्ये (रा. लांजा रेस्ट हाऊस) यांनी दिली होती. श्रेयस शेट्ये हे प्राणी कायदा नियंत्रण, मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून काम करतात. आसगे-टोळेवाडी येथून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार शेट्ये व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी खेरवसे-आसगे- केळंबे रस्त्यावर पाळत ठेवली होती. रात्री टेंपो खेरवसे-जाधववाडी येथे प्राणीमित्रांनी थांबविला. हा टेंपो समीर खानविलकर चालवित होता. ही गुरे बाबल्या लांबोर यांनी आसगे येथून खरेदी केली होती. प्राणीमित्रांनी त्या दोघांना लांजा पोलिसांच्या ताब्यात दिले. विनापरवाना व बेकायदा गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बावल्या लांबोर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 27/Sep/2024