रत्नागिरी : कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांची हॉटेल मथुरा एक्झिक्युटिव्हला इंडस्ट्रियल भेट

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आवारामधील कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी थिबा पैलेस येथील प्रसिद्ध हॉटेल मथुरा एक्झिक्युटिव्ह ला इंडस्ट्रियल भेट दिली. या भेटीमध्ये कौशल्य विकास केंद्रातील फूड एंड बेवरेज सर्विस असोसिएट आणि असिस्टंट शेफ, या बॅच मधील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी कौशल्य विकास केंद्राच्या शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांना सर्व विभाग दाखवून विस्तृत महिती दिली.

या वेळी हॉटेल मथुरा एक्झिक्युटिव्ह च्या प्रत्येक विभागाच्या स्टाफने रिसेप्शन-फ्रंट ऑफिस, रेस्टॉरंट, किचन या विभागांमध्ये कशा प्रकारे कामकाज चालते याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह महिती दिली.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना आजच्या भेटीमध्ये या क्षेत्रातील नवनवीन माहिती अनुभवायला मिळाली याबद्दल हॉटेल मथुरा एक्झिक्युटिव्ह व कौशल्य विकास केंद्र यांचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी हॉटेल मथुरा एक्झिक्युटिव्ह चे मॅनेजर श्री रूपेश देवस्थळी व हेड शेफ श्री भूपेंद्र सिंग यांनी विशेष सहकार्य केले. कौशल्य विकास केंद्राच्या प्लेसमेंट हेड सौ अश्विनी वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या इंडस्ट्रियल भेटीमुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधींची माहिती होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आणि हॉटेल व्यवस्थापनाचे आभार मानले.

या प्रसंगी सर्व विद्यार्थी, हॉटेल मथुरा एक्झिक्युटिव्ह चे मॅनेजर श्री रुपेश देवस्थळी हेड शेफ श्री भूपेंद्र सिंग हॉटेलमधील सर्व कर्मचारी, कौशल्य विकास केंद्राच्या प्लेसमेंट हेड सौ अश्विनी वाणी, शिक्षकवर्ग श्री अमेय मुळ्ये, श्री तेजस टिकेकर, श्री अमित धाटावकर, आदी कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 27/Sep/2024