लांजा : खोरनिनको येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थानचा २६ डिसेंबर पासून रौप्य महोत्सव

लांजा : लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील प्रसिद्ध असलेल्या श्री बल्लाळ गणेश देवस्थानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा रौप्य महोत्सव सोहळा २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

श्री बल्लाळ देवस्थान, गणेश प्रभानवल्ली येथील श्री चे ३५ वे प्रकट वर्ष व स्थापना दिवस २५ वे असून रौप्य महोत्सवी उत्सव सोहळा गुरुवार २६ ते शनिवार २८ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये २६ डिसेंबर रोजी प. पू. देसाई महाराज पादुका पालखी पायी दिंडी सोहळा स. १० वा. बाबा भिंगार्डे यांचे घर ते वाघजाई मंदिर, दु. १२ वा. उंबरेश्वर मंदिर येथे विश्रांती व प्रसाद, दु. २ वा. श्री वाघजाई मंदिर व श्री आदिष्टी मंदिरापासून भजन व दिंडीसह वचनाचा नारळ व ध्वज घेऊन श्री बल्लाळ गणेश मंदिर, ५. ३० वा. गणेशयाग यज्ञ यजमान रवींद्र पराडकर गुरुजी व सामुदायिक आरती. शुक्रवार २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२. ३० वा. धार्मिक विधी श्री च्या मुर्तीवर अभिषेक, ध्वजपूजन व इतर मुर्तीवर अभिषेक, महापूजा महाआरती व प. पू. देसाई महाराज चरित्रामृत ग्रंथाचे पूजन, ५ वा. बुवा उमेश बेर्डे, नागरफळेवाडी आणि मंडळी, प्रभानवल्ली यांचे भजन, ७. ३० वा. दिपोत्सव व प.पू.देसाई महाराज पालखी प्रदक्षिणा, २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. होमहवन, धार्मिक विधी समाप्ती, आमदार किरण सामंत यांच्याहस्ते महापूजा व महाआरती, १० वा. भजन महिला मंडळ, ३२ शिराळा, ११ वा. ते १२ वा. प.पू. देसाई महाराज चरित्रामृत ग्रंथाचे अनावरण, १२ ते. ३. ३० वा. महाप्रसाद, ५.३० वा. हरिपाठ श्री सदगुरू वामनराव पै उपासना यज्ञ, कार्यकत्यांचा गौरव, पुष्पप्रसाद व उत्सव समाप्ती कार्यक्रम होणार आहेत. सोहळ्यानिमित्त लांजा आगारातून एसटी बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बल्लाळ गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमोल रेडिज, वसंत पावसकर देवस्थानकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 13/Dec/2024

Shanti real estate 1