रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकर्यांना शेतीकडे वळवून पारंपरिक भातपिकांबरोबरच अन्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कृषी विभागाकडून राबवण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 590 गावात साडेतीन हजार शेतकर्यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतीशी निगडित उपकरणांची खरेदी केली. यातून शासनाने त्यांच्या खात्यात 78 लाखाहून अधिक अनुदान जमा केले आहे. यामुळे शेतकर्यांना शेती उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन मिळत आहे.
जिल्ह्यातील दीड लाख शेतकर्यांना पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. अन्य विविध योजना देखील केंद्र व राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत. यातील राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकर्यांना शेतीशी संबंधित मुख्य उपकरणांच्या खरेदीवर 80 कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा कमी वेळेत व कमी श्रमात अधिक पिके घेण्यासाठी व उत्पादन वाढवण्यासाठी शेतीविषयक उपकरणे खरेदीसाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकर्यांना पॉवरटिलर, पॉवर व्हीडर, ग्रास कटर, ब्रश कटर, मोटर पंप, इलेक्ट्रीक मोटर, पॉवर स्पेअर आदी उपकरणे उपयुक्त ठरतात. मात्र, महागाईमुळे शेतकर्यांकडून ही उपकरणे खरेदी होत नसल्याने शेतीचे उत्पादन घटत चालले आहे. त्यामुळे शेतकर्यांना कृषी उपकरण खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या अनुदानाचा 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे साडेतीन हजार लाभ घेतल्याने शासनाने त्यांच्या खात्यात 78 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त करून दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 27-09-2024