लांजा रेल्वेस्टेशनदरम्यान रेल्वेतून पडून तरुण जखमी

रत्नागिरी : रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या मध्य प्रदेश येथील तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामसजीवन बैगा (वय २४, रा. उरती, चिंगरोली मध्य प्रदेश) असे जखमीचे नाव आहे.

ही घटना रविवारी (ता. १५) सकाळी लांजा रेल्वेस्टेशनदरम्यान निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामसजीवन हा रेल्वेतून पडून जखमी झाला. उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत; मात्र तो कोणत्या गाडीने कुठून कुठे जात होता याची माहिती मिळू शकली नाही. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या अपघाताची नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 17-09-2024