बदलापूर एन्काऊंटर; मनसेकडून खेडमध्ये साखर वाटप

खेड : बदलापूर येथील बालिकेवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे या नराधमाचा पोलिसांच्या एन्काऊंटनंतर कारवाईत मृत्यू झाला. या कारवाईचे खेडमध्ये मनसेतर्फे बुधवारी दि. २५ रोजी स्वागत करत साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

बदलापूर एन्काऊंटरमध्ये नराधम अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याने पीडितेला न्याय मिळाला, अशी भावना संपूर्ण देशांमध्ये आहे. खेड मनसेचे अध्यक्ष नीलेश बामणे व महिला कार्यकर्त्यांनी खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी मनसे महिला आघाडी तालुकाध्यक्ष राजश्री पाटणे म्हणाल्या, शर्मिला ठाकरे यांनी एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्यावतीने आम्ही देखील त्यांचे अभिनंदन करतो.

नराधमावर पोलिस कारवाईत एन्काऊंटर झाल्याबद्दल खेड शहरांमध्ये फटाके वाजवून आणि साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी संजय आखाडे, तालुकाध्यक्ष नीलेश बामणे, शहराध्यक्ष हृषीकेश कानडे, शहराध्यक्ष मीनल गांधी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, मिलिंद नांदगावकर, उपतालुका अध्यक्ष गणेश सुर्वे, साधना वैराग, प्रीती चिखले आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 28/Sep/2024