रत्नागिरी : काँग्रेस भवन येथील रस्त्यावरील सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

रत्नागिरी : शहरातील काँग्रेस भवन येथील रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्यामुळे येथील नागरिक आणि वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत.

येथील माजी नगरसेवकांच्या कानावर ही समस्या घालून देखील काहीही उपयोग झाला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या सांडपाण्यामुळे येथे चिखलाचे साम्राज्य असते. तसेच या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातूनच नागरिकांना चालत जावे लागत आहे. नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 19-12-2024

Samarth gold