डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी कारवाई करण्याची लांजा तालुका बौद्धजन मंडळाची मागणी

लांजा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या भाजप नेता तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालट्टी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लांजा तालुका बौद्धजन मंडळ, मुंबई ग्रामीण विभागाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

भाजप नेते व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घडलेल्या अवमानकारक वक्तव्याचा लांजा तालुका बौद्धजन मंडळ, मुंबई-ग्रामीण च्यावतीने जाहीरपणे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. संसदेमध्ये अवमान करण्याचे धाडस भाजप नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केला असल्याचा आक्षेप निवेदनात घेण्यात आला आहे. या प्रकरणी शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात येऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सर्व आंबेडकरी अनुयायी आपणाकडे मागणी करत आहोत, असेही म्हटले आहे.

तहसीलदार यांना निवेदन देताना लांजा तालुका बौद्धजन मंडळ ग्रामीणचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सचिन जाधव, उपाध्यक्ष धर्मदास बापेरकर, बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आर बी कांबळे, वंचित तालुका अध्यक्ष मोहन धनावडे, वंचितचे सचिव दीपक पवार, सल्लागार प्रभाकर कांबळे, सल्लागार अनिरुद्ध कांबळे, दाजी गडहिरे, प्रभाकर जाधव, सुरेश कांबळे, बबन कांबळे, भिकाजी कांबळे, अरुण धनावडे, दीपराज कांबळे, मिथून कांबळे, किरण कांबळे, अनोज जाधव आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 21/Dec/2024