रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी वैभव गारवे

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते कर्जत नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. मावळते मुख्याधिकारी तुषार बाबर यांचा मंगळवारी सायंकाळी ४ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात निरोप समारंभ होणार आहे.

नूतन मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी यापूर्वी बीडमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन प्रथम म्हसळा नगरपंचायतीत मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर शहापूर नगरपंचायतीतही मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

दरम्यानच्या काळात कोकण भवन येथे एक वर्ष सहायक संचालक म्हणून सेवा बजावली आहे. आज त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या कार्यकाळात रत्नागिरी शहरात जलतरण तलाव, काँक्रीट रस्ते, तारांगण, शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, विठ्ठल मूर्ती, सायन्स आर्ट गॅलरी, थ्रीडी मल्टिमीडिया मल्टिस्पेशालिटी शो, हॉस्पिटल, डी.पी., टी.पी. योजनेतील रस्ते अशी अनेक विकास कामे पुर्ण झाली आहेत. तुषार बाबर यांना अजून कुठेही नियुक्ती मिळालेली नाही. त्यांचा मंगळवारी सायंकाळी ४ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह येथे निरोप समारंभ होणार आहे.

Hotel waiter

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 22/Apr/2025