रत्नागिरी : अर्धन्यायिक दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे व अॅड. संजय सेंगर यांचा जिल्हा दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यादरम्यान आयोगाच्या सदस्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सुनावण्या येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात घेतल्या. शैक्षणिक, पोक्सो अॅक्ट आदी प्रकरणे सुनावणीसाठी आयोगासमोर आली होती. १० प्रकरणांपैकी ३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
दौऱ्यादरम्यान आयोगाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचीही भेट घेऊन जिल्ह्यातील बालकल्याण संबंधित विविध योजना व प्रश्न यावर चर्चा केली. यानंतर सदस्यांनी जिल्हा बालकल्याण समितीच्या कार्यालयास भेट देऊन समिती सदस्यांशी चर्चा केली. तसेच शहरातील शासकीय बालगृह व निरीक्षणगृहाला देखील भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 28/Sep/2024