खेड : गोवंश हत्येप्रकरणी संशयितांना कोठडी

खेड : तालुक्यातील देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात गोवंशाचे अवशेष आढळल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयीने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

२२ डिसेंबरला दुपारी खेड शहरानजीकच्या नारिंगी नदीवरील देवणे पुलाखाली गोवंशाची हत्या करून त्याचे अवशेष टाकलेले होते. २३ डिसेंबरला पुन्हा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आणखी गोवंशाचे अवयव देवणे पूल परिसरातील नारिंगी नदीपात्रात आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तिघांच्या मुसक्या आवळल्या, तर अन्य एकास मंगळवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 26-12-2024