संदीप फटकरेच्या न्यायासाठी चांदोर गाव आला एकत्र; पोलीस स्थानकामध्ये जाऊन विचारणार जाब

रत्नागिरी (वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील चांदोर या गावातील संदीप नारायण फटकरे वय ३३ याचा सापुचेतळे येथे वडापाव विकण्याच्या गाडी जवळ तो बेशुद्ध पडून त्यानंतर झालेला मृत्यू गावाच्या जिव्हारी लागला असून सर्व गावकऱ्यांनी शनिवार एकत्रित जमत संशयितावरती पोलीस कारवाई करीत नसल्याने सोमवारी संपूर्ण गावा आपली घरे बंद ठेऊन पावस सागरी पोलीस स्थानकामध्ये याचा जाब विचारणार आहेत़
सापुचेतळे येथील वडापावची गाडी चालविणारे संदीप फटकरे यांचा २४ सप्टेंबरला झालेला मृत्यू त्यांचे कुटुंब उद्धस्त करणारा असून गावकऱ्यांनी एकत्र येत त्याला न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे़  संदीप हा सर्वांशी मैत्री असणारा शांत स्वभावाचा वृद्धांसह, लहानांशी अदबीने वागणारा होता़  या कुटुंबाचा उदरनिर्वाह या वडापावच्या गाडीवरच होता तसेच गावातील नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते यामुळेच सर्व गावकरी एकत्र आले असून त्याचे मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीसांनी सहकार्य करावे आणि आरोपीला अटक करावी या मागणीसाठी गावकरी एकत्र आली असून ते शनिवारी सायंकाळी एकत्र जमले होते़. तेव्हा हा निर्णय घेण्यात आला.