गावखडी : पावस विभागातील डोर्ले येथे सतत 8 दिवसात अधून मधून बिबट्याचा दर्शन होत असून त्याने पाळीव कुत्रे मांजर तसेच उनाड कुत्र्यांचा फडश्या पाडला असून अश्या मस्तवाल बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी डोर्लेतील सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहे.
नेहमी दिसणारा बिबट्या प्रवास करणाऱ्यांना संध्याकाळी 7 वाजल्या पासून ते रात्री 10 वाजे पर्यंत डोर्ले येथील भंडारवाडी येथे दिसत आहे हा मस्तवाल बिबट्या रात्री रस्त्यात उभा असल्यास पळत सुद्धा नाही मागील 2 दिवसा पूर्वी डोर्ले ते घावळ वाडी असा प्रवास करताना ग्रामस्थ वासुदेव जुवळे यांना दिसला व तो रस्त्यात ठाण मांडून बसल्याने त्याची बोबडी वळली अश्यातच त्या बिबट्या ने कुत्र्या मांजरा सह फडशा पाडून आपला मोर्चा पाळीव कोंबड्यांवर वळविला आहे अश्या ह्या बिबट्याचा मोठी दुर्घटना घडण्या आधी वनविभागाने त्वरीत बंदोबंस्त करावा अशी मागणी संतोष पोकडे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:52 AM 30/Sep/2024