1 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई येथे मिशन कोकण दौरा

मुंबई आणि कोकणातील विधानसभा जागांचा आढावा घेणार

रत्नागिरी : लवकरच महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक जाहीर होईल. सर्वत्र राजकीय वातावरण ढवळून निघालेले पाहायला मिळते आहे. सर्वच पक्ष आपापल्या परीने कामाला लागले असून. बैठकांचे सत्र महाराष्ट्रात सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १ ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. ते मुंबई आणि कोकणातील विधानसभा जागांचा आढावा घेतील.

शाह यांनी अलीकडेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या बैठका घेतल्या होत्या. आता त्यांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. सोबतच ठाण्यासह कोकणात भाजपची काय परिस्थिती आहे, हे देखील ते जाणून घेणार आहेत. कोकणातील सर्व विधानसभा मधून भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते या बैठकीसाठी मुंबई येथे रवाना होणार असल्याचे कळते. कोकणातील जागांवर या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मुंबईत एकच जागा जिंकता आली. तर कोकणामध्ये भाजपला चांगले यश मिळाले. यासंदर्भात अमित शाह काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीदरम्यान मुंबई आणि कोकणातील जागा वाटपांबाबत भाजपा नेते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा किंवा काही निर्णय होतो का हे पाहणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 30/Sep/2024