दापोलीत आज प्रशिक्षणार्थी भरती मेळावा

रत्नागिरी : बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळावा सोमवारी ३० सप्टेंबरला सकाळी १० वाजता दापोली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थांकडील विविध आस्थापना २५०० पेक्षा अधिक पदांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची निवड करणार आहेत. उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीवेळी बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कौशल्य रोजगार व नावीन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नावनोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिसाळ यांनी केले आहे.