एमसी स्टॅन बेपत्ता ?

बिग बॉस 16 चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन याच्याबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आलाय. यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. लोक हैराण झाले आहेत.

मुंबई, पुणे आणि नाशिक शहरामध्ये अनेक भागांमध्ये एमसी स्टॅन हा गायब झाल्याचे पोस्टर लावण्यात आलंय.

यामुळेच मोठी खळबळ निर्माण झाल्याच बघायला मिळतंय.

एमसी स्टॅन हा मुंबईतून गायब झाल्याचेही सांगितले जातंय. मात्र, याबद्दल अजून एमसी स्टॅनच्या कुटुंबाकडून काहीच खुलासा हा करण्यात आला नाहीये. मात्र, चाहते हैराण झाले. सोशल मीडियावर एमसी स्टॅन बेपत्ता झाल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

काही लोकांचे म्हणणे आहे की, हा एक मोठा पीआर स्टंट आहे. अनेकांनी म्हटले की, त्याचे एखादे गाणे वगैरे लॉन्च होणार असावे बहुतेक त्यासाठी हे सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच एमसी स्टॅन याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तो त्रस्त असल्याचे त्या पोस्टवरून स्पष्ट दिसत होते…त्याचे गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 30-09-2024