गुहागर : गुहागर आगाराला नव्या २५ गाड्या मिळाव्यात. तसेच आवश्यक कामगार व कार्यशाळेत साहित्य मिळावे, यासाठी प्रवासी संघटनेच्यावतीने गुहागर एस.टी. आगारातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रवासी राजा दिनाचे औचित्य साधून हे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष पराग कांबळे, उपाध्यक्ष सुहास शेटे, प्रभुनाथ देवळेकर, खजिनदार रमाकांत खेडेकर, विनायक मुळे, रवींद्र दीक्षित, अमृता जोशी, महिला अध्यक्ष आदींसह अन्य प्रवासी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी येथून जिल्हा व्यवस्थापक बोरसे, आगारप्रमुख अशोक चव्हाण व सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले.
प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभुनाथ देवळेकर यांनी, गुहागर ते डेरवण बसफेरी नव्याने सुरु करावी, गुहागर-गणेशखिंड मार्ग ही सेवा दोन तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला सोयीची होईल.
तसेच गुहागर-असगोली मार्गावर बसफेरीसाठी सरपंच छाया कटनाक व उपसरपंच प्रदीप घाणेकर, ग्रामपंचायत सदस्य संजय घुमे यांनी मागणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 03/Jan/2025














