चिपळुणात आज श्री भवानी देवीचा शांकभरी पौर्णिमा उत्सव

चिपळूण : चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत श्री काळभैरव पंचायतन परिवारापैकी श्री देवी भवानी मंदिर (श्री क्षेत्र गांधारेश्वर) चिपळूण येथे श्री शाकंभरी पौर्णिमा (पौष पौर्णिमा) उत्सव १३ जानेवारी रोजी साजरा करण्यात येत आहे.

यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री भवानी मातेची पंचामृती पूजा, अभिषेक आदी धार्मिक विधी, सकाळी ७ ते १२:३० पर्यंत श्री नव चंडी याग हवन, पूर्णः हुती, आरती, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ संगीत भजन श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ चिपळूण, सायंकाळी ६ ते ८ कै. वामनराव साडविलकर संस्थापित, स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली कार्यक्रम, रात्री ८:३० वा. महाआरती होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 13/Jan/2025